achukbaatmi.com
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
achukbaatmi.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

अतिवृष्टीचे १२७८ कोटी अनुदान वितरीत…

Achuk Baatmi by Achuk Baatmi
December 3, 2025
in ग्रामीण, राजकारण, संपादक, संस्कृती व परंपरा
0
सबका विश्वास,सबका प्रयास हिच आपली ताकद — राणा जगजीतसिंह पाटील
0
SHARES
5
VIEWS

धाराशिव

अडचणीच्या काळात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा : आमदार राणाजगजितसिंह पाटील

यंदाच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकर्यांसना महायुती सरकारने जाहीर केलेल्या अनुदानापोटी ₹ १२७८ कोटी दिवाळीपासून आजवर शेतकर्यांनच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. अडचणीच्या काळात असलेल्या शेतकर्यांीना महायुती सरकारने दिलेल्या अनुदान आणि मदतीमुळे मोठा दिलासा मिळाला असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले आहे.

जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात यंदा अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेती आणि शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. खरिपातील पिकांना बसलेल्या फटक्यामुळे पीकविमा मिळण्यात येणाऱ्या अडचणीही आता दूर झाल्या आहेत. पीक कापणी प्रयोगातील काही बाबींवर विमा कंपनीने आक्षेप घेतलेला होता. त्यावर सुनावणी सुरू आहे. पीकविमाही लवकरच शेतकर्‍ यांच्या थेट खात्यात जमा होण्यास लवकरच सुरुवात होईल, याची खात्री असल्याचेही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकर्यांरना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी अनुदान आणि मदत जाहीर करून मोठा दिलासा दिला आहे. शेतकर्यांफना नुकसानीच्या दुःखातून बाहेर काढून त्यांना नव्या उमेदीने उभे करण्यासाठी आपल्या महायुती सरकारने अभुतपूर्व मदतीचा हातभार दिला आहे. एकंदरीत अडचणीच्या काळात अत्यंत संवेदनशीलपणे आपल्या महायुती सरकारने शेतकरी बांधवांना दिलासा दिला आहे. खंबीरपणे अडचणीच्या काळात अभुतपूर्व मदत दिल्याबद्दल जिल्ह्यातील तमाम शेतकरी बांधवांच्या वतीने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सरकारचे धन्यवाद मानले आहेत.

जिल्ह्यात सन २०२५ मध्ये झालेल्या सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे बाधित शेतीपीक व इतर नुकसानीच्या भरपाईसाठी शासनाने मंजूर केलेल्या अनुदान वितरण प्रक्रियेला मोठी गती मिळाली आहे. अनेक लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट रक्कम जमा झाली असून उर्वरित शेतकऱ्यांनाही वेळेत लाभ मिळावा यासाठी जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर काम करत असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

Facebook Page Instagram Page WhatsApp Group Youtube आमच्या मीडिया हॅण्डल ला लाईक व फॉलोव करा

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने धाराशिव जिल्ह्यातील एकूण ९,७६,८२५ खात्यांवर तब्बल ₹१२७८.६८९७ कोटींचे अनुदान वितरित झाले आहे. या आर्थिक सहाय्यामध्ये पिकांचे नुकसान, शेतजमिनीची हानी, रब्बी पेरणी व इतर आनुषंगिक बाबींसाठीच्या मदतीचा समावेश आहे. शासनाच्या नवीन निकषांनुसार ३ हेक्टर मर्यादेपर्यंतच्या नुकसान भरपाईसाठीही अनुदान उपलब्ध होणार आहे.

अनुदान थेट खात्यावर जमा करण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य असून शेतकऱ्यांनी ती तात्काळ पूर्ण करावी, असे आवाहनही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे. तसेच सामाईक क्षेत्रधारक शेतकऱ्यांनी अनुदान ज्यांच्या नावावर घ्यावयाचे आहे त्या व्यक्तीच्या नावाचे संमतीपत्र तयार करून संबंधित तलाठी कार्यालयात सादर करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. कागदपत्रांची पूर्तता व ई-केवायसी पूर्ण झालेल्या खात्यांवर अनुदान वितरणाला प्राधान्य देण्यात येणार आहे. अतिवृष्टी आणि सततच्या पावसाच्या अभूतपूर्व संकटात शेतकऱ्यांना दिलेला शब्द आपल्या महायुती सरकारने पाळला आहे. इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी धाराशिव जिल्ह्यासाठी उपलब्ध झाला आहे. कठीण काळात शेतकऱ्यांना मिळणारे हे आर्थिक बळ अत्यंत महत्त्वाचे आहे. आपले महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. ही समाधानकारक बाब आहे. आणि यासाठी माननीय मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शेतकरी बांधवांच्या वतीने जाहीर आभार मानले आहेत.

पीक विमाही लवकरच मिळणार

पीक विमा खरीप २०२५ संबंधित प्रक्रिया सुरू असून पिक कापणी प्रयोगाच्या आधारे विमा कंपनीने नोंदविलेल्या आक्षेपांवर जिल्हाधिकारी स्तरावर सुनावणीची कार्यवाही सुरू आहे. सुनावणी संपल्यानंतर शेतकऱ्यांना विमा रक्कम वितरणाचा मार्ग मोकळा होईल, अशी अपेक्षा आमदार श्री. राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केली. शासन व प्रशासनासोबत शेतकऱ्यांना योग्य लाभ मिळावा यासाठी सतत प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

Previous Post

ठाकरे सेनेच्या माजी नगराध्यक्ष, आमदार आणि खासदारांनी नगरपालिकेत केला २५० कोटींचा भ्रष्टाचार

Next Post

वर्षात फक्त स्थगिती दिसली प्रगती नाही! तानाजी जाधवर यांचा भाजपवर पलटवार

Related Posts

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा एल्गार
ग्रामीण

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा एल्गार

January 9, 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
ग्रामीण

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

January 9, 2026
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी
ग्रामीण

धाराशिव पालिकेत भाजपची सत्ता येताच ११७ कोटींच्या रस्त्यांवरील स्थगिती उठली

December 22, 2025
सबका विश्वास,सबका प्रयास हिच आपली ताकद — राणा जगजीतसिंह पाटील
ग्रामीण

शहरातील रस्ते कामांचा मार्ग मोकळास्थगिती रद्द : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

December 22, 2025
दक्षिण पुण्यात सावंत विहार येथे विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न!
मनोरंजन

दक्षिण पुण्यात सावंत विहार येथे विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न!

December 15, 2025
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी
ग्रामीण

शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी

December 12, 2025
Next Post
अंगाशी आलं की पळ काढणं ही राणा पाटील यांची जुनी सवय – शिवसेना प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी काढला भाजपला चिमटा

वर्षात फक्त स्थगिती दिसली प्रगती नाही! तानाजी जाधवर यांचा भाजपवर पलटवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025