achukbaatmi.com
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
achukbaatmi.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

तुळजापुरात सीमोल्लंघन सोहळा उत्साहात संपन्न

Achuk Baatmi by Achuk Baatmi
October 2, 2025
in ग्रामीण, संपादक, संस्कृती व परंपरा
0
तुळजापुरात सीमोल्लंघन सोहळा उत्साहात संपन्न
0
SHARES
14
VIEWS

तुळजापूर

श्री क्षेत्र तुळजापूर येथे सुरू असलेल्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने आज गुरुवारी पहाटे पारंपरिक सीमोल्लंघन सोहळा अत्यंत भक्तिभावाने व उत्साहात पार पडला.उगवत्या सूर्याच्या पहिल्या किरणात, कूंकवाच्या मुक्त उधळणीत आणि “आई राजा उदो-उदो” च्या जल्लोषात तुळजाभवानी देवींचा हा सोहळा पारंपरिक रीतिरिवाजांनुसार साजरा करण्यात आला.

पहाटे श्री तुळजाभवानी देवीची १०८ साड्यांमध्ये गुंडाळून भिंगार (अहिल्यानगर) येथून आलेल्या मानाच्या पालखीतून मंदिराला एक प्रदक्षिणा पूर्ण करत मिरवणूक काढण्यात आली.प्रदक्षिणेच्या दरम्यान देवीची पालखी पिंपळाच्या पारावर टेकवून आरती करण्यात आली.

विजयादशमीच्या दिवशी श्री तुळजाभवानी देवी आपले सिंहासन सोडून भाविकांसोबत सीमोल्लंघन करण्यासाठी मंदिराबाहेर येते,अशी परंपरा आहे.सीमोल्लंघन पूर्ण झाल्यानंतर देवी पौर्णिमेपर्यंत निद्रा अवस्थेत जाते.हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती.

Facebook Page Instagram Page WhatsApp Group Youtube आमच्या मीडिया हॅण्डल ला लाईक व फॉलोव करा

यावेळी संपूर्ण परिसरात कुंकवाची मुक्त उधळण करण्यात आली. भाविकांच्या “आई राजा उदो-उदो” च्या घोषणांनी मंदिर परिसर दुमदुमून गेला.

मंदिरातील या धार्मिक सोहळ्याला आमदार तथा विश्वस्त राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी तथा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार,पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर,अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना,उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, सौ.सौमय्याश्री पुजार,तहसीलदार अरविंद बोळंगे,तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, महंत तुकोजी बुवा,महंत चिलोजी बुवा,महंत हमरोजी बुवा,महंत वाकोजी बुवा,भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम,पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे,उपाध्ये पुजारी मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो व मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.

दरवर्षी शारदीय नवरात्रात होणाऱ्या या पारंपरिक सीमोल्लंघन सोहळ्याची भाविक आतुरतेने वाट पाहत असतात.आजही पहाटेपासूनच हजारो भाविक मंदिर परिसरात जमले होते.कुंकवाची उधळण,देवीच्या जयघोषांनी तुळजापूर नगरी मंगलमय वातावरणात न्हाऊन निघाली.

Previous Post

शेतकऱ्यांच्या संकटात उबाठा नेत्यांनी राजकारणाची नौटंकी बंद करावी- ऍड नितीन भोसले

Next Post

पोपट पवार यांनी विष प्राशन करून केली आत्महत्या

Related Posts

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा एल्गार
ग्रामीण

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा एल्गार

January 9, 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
ग्रामीण

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

January 9, 2026
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी
ग्रामीण

धाराशिव पालिकेत भाजपची सत्ता येताच ११७ कोटींच्या रस्त्यांवरील स्थगिती उठली

December 22, 2025
सबका विश्वास,सबका प्रयास हिच आपली ताकद — राणा जगजीतसिंह पाटील
ग्रामीण

शहरातील रस्ते कामांचा मार्ग मोकळास्थगिती रद्द : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

December 22, 2025
दक्षिण पुण्यात सावंत विहार येथे विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न!
मनोरंजन

दक्षिण पुण्यात सावंत विहार येथे विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न!

December 15, 2025
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी
ग्रामीण

शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी

December 12, 2025
Next Post
पोपट पवार यांनी विष प्राशन करून केली आत्महत्या

पोपट पवार यांनी विष प्राशन करून केली आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025