धाराशिव
धाराशिव जिल्ह्यात आज दुसरी दुर्दैवी घटना घडली आहे काल अणदूर येथील उमेश सूर्यकांत ढेपे वय वर्ष ४५ या शेतकऱ्याने कर्ज व अतिवृष्टीला कंटाळून आत्महत्या केली होती. 24 तासातच धाराशिव जिल्ह्यात दुसरी घटना समोर आली आहे धाराशिव तालुक्यातील वाखरवाडी येथील पोपट केशव पवार वय वर्ष ५५ या शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलल असून नापिकी, कर्ज आणि अतिवृष्टी यामुळे गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपावल आहे.
धाराशिव जिल्ह्याला अतिवृष्टीचा फटका बसलाय. या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्याचे सर्व पिके पाण्यात गेल्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे. वाढते कर्ज शेतीत होणारे नुकसान यामुळे शेतकरी आता आत्महत्याचा मार्ग स्वीकारत आहेत. धाराशिव जिल्ह्यात 24 तासात दोन शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपावल आहे.
पोपट केशव पवार यांनी गुरुवारी सकाळी स्वतःच्या राहत्या घरात विष प्राशन करून स्वतःचे जीवन संपल आहे. पोपट पवार यांच्यावर गेल्या अनेक वर्षापासून कर्जाचा बोजा होता. यावर्षी झालेली अतिवृष्टी, शेतात झालेले नुकसान आणि वाढते कर्ज यामुळे पोपट पवार यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे.
पोपट पवार यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे.कळंब धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी पोपट पवार यांच्या कुटुंबीयांना सांत्वनपर भेट दिली. धाराशिव जिल्ह्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.






