achukbaatmi.com
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
achukbaatmi.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

जिल्ह्यातील वीज कर्मचारी संपावरवीज कंपन्यांच्या खाजगीकरणाला विरोध

Achuk Baatmi by Achuk Baatmi
October 9, 2025
in ग्रामीण, राजकारण, संपादक, संस्कृती व परंपरा
0
जिल्ह्यातील वीज कर्मचारी संपावरवीज कंपन्यांच्या खाजगीकरणाला विरोध
0
SHARES
78
VIEWS

धाराशिव

निर्मिती, पारेषण व वितरण या तिन्ही वीज कंपन्यात अनेक पद्धतीने सुरु असलेले खाजगीकरण, महावितरण कंपनीच्या नफ्याच्या क्षेत्रात टोरंटो, अदानी व इतर खाजगी भांडवलदारांना समांतर वीज वितरणाचा परवाना, एकतर्फी पुर्नरचना लागू करणे, वीज कर्मचार्‍यांना पेन्शन लागू करणे व इतर धोरणात्मक विषयावर क्रमबद्ध आंदोलनाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नोटीस देऊन गेल्या पंधरा दिवसांपासून क्रमबद्ध आंदोलन राज्य विद्युत कर्मचारी, अभियंता, अधिकारी कृती समितीने सुरू केलेली आहे. त्याअनुषंगाने मंगळवारी मध्यरात्रीपासून पुढील 72 तासापर्यंत जिल्ह्यातील एक हजार वीज कर्मचारी संपावर गेले आहेत. बुधवारी महावितरणच्या मुख्य कार्यालयासमोर संपातील वीज कर्मचार्‍यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी निदर्शने केली.
जानेवारी 2023 पासून ज्वलंत व महत्वाच्या विषयांबाबत कृती समिती सातत्याने शासनाशी व प्रशासनासोबत पत्र व्यवहार करत आहे. 4 जानेवारी 2023 रोजी मुख्यमंत्र्यांनी तिन्ही वीज कंपन्यांचे व्यवस्थापन व कृती समिती यांची संयुक्त बैठक घेतली. बैठकीमध्ये तिन्ही वीज कंपन्यांमध्ये कोणत्याही पद्धतीचे खाजगीकरण करण्यात येणार नाही. उलट या कंपन्यांच्या आर्थिक बळकटी करता राज्य शासन 50 हजार कोटींचे अर्थसहाय्य करेल, असे कामगार संघटना प्रतिनिधी बरोबर संयुक्त पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते. मुख्यमंत्री वांच्या आश्वासनानंतर कृती समितीने 4 जानेवारी 2023 रोजीचा संप स्थगित केला होता. मुख्यमंत्री यांनी दिलेल्या आश्वासनाचा भंग करत तिन्ही वीज कंपन्यांच्या प्रशासनाने विविध मार्गान खाजगीकरणाची प्रक्रिया सुरू केलेली आहे. खाजगीकरण व इतर प्रलंबित विषयांवर शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी 9 ते 11 ऑक्टोबर 2025 असे तीन दिवस संप करण्याचा निर्णय कृती समितीने जाहीर केला आहे.
शासन, ऊर्जा विभाग व तिन्ही वीज कंपन्यांचे प्रशासन न्यायिक मागण्या कडे दुर्लक्ष करत असल्यामुळे नाईलाजाने आंदोलनाचा निर्णय कृती समितीला घ्यावा लागला असल्याने आंदोलनामध्ये राज्यातील 86 हजार कामगार, अधिकारी, अभियंता व कंत्राटी व बाह्य स्तोत्र कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. बुधवारच्या आंदोलनात जिल्ह्यातील सात संघटनांचे पदाधिकारी बापू जगदे, बाळकृष्ण डोके, बी. एस. काळे, प्रवीण रत्नपारखी, नवनाथ काकडे, रवींद्र ढेकणे आदींनी सहभाग नोंदविला होता. दरम्यान या संपात जिल्ह्यातील सर्व महावितरण कार्यालयातील एकूण एक हजार अधिकारी, अभियंते, कर्मचारी सहभागी झाले आहेत.

Facebook Page Instagram Page WhatsApp Group Youtube आमच्या मीडिया हॅण्डल ला लाईक व फॉलोव करा

या आहेत प्रलंबित मागण्या….


महावितरण कंपनीच्या कार्यक्षेत्रात समांतर वीज वितरण परवाना देण्यास विरोध, महावितरण कंपनीचे 329 उपकेंद्र कंत्राटी पद्धतीने चालविण्यास देण्यास विरोध, महापारेषण कंपनीमधील 200 कोटींच्या वरील प्रकल्पाच्या माध्यमातून भांडवलदारांना देण्यास विरोध व महापारेषण कंपनीचा शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग करण्यास विरोध, महानिर्मिती कंपनीचे जलविद्युत प्रकल्पाचे खाजगीकरण करण्यास विरोध, वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी यांना राज्य शासनाने मंजूर केलेली पेन्शन योजना त्वरित लागू करणे, 7 मे 2021 चा शासन आदेश सुधारित करून मागासवर्गीयांना पूर्वलक्षी प्रभावाने पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करणे तसेच सेवा जेष्ठतेनुसार खुल्या प्रवार्गातूनही पदोन्नती देणे, तिन्ही वीज कंपन्यातील वेतंगत 1 ते 4 स्तरावरील संवर्गनिहाय रिक्त पदे पदोन्नती, सरळसेवा भरती व अंतर्गत भरतीद्वारे एम.एस.ई.बी. होल्डिंग कंपनीच्या मूळ इठ प्रमाणे भरणे, कंत्राटी, बाह्यस्त्रोत कर्मचारी यांना नोकरीत समाविष्ट करण्याबावत उपाययोजना करणे, महावितरण कंपनीच्या चुकीच्या पुर्नरचनेच्या प्रस्तावाची अंमलबजावणी त्वरित थांबविणे इत्यादी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.

Previous Post

शेतकरी पुत्र जगदीश पाटील यांची शिवसेनेच्या जिल्हा प्रवक्ते पदी निवड

Next Post

शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबर कौशल्य प्राप्त करणे गरजेचे – नरेश गडम

Related Posts

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा एल्गार
ग्रामीण

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा एल्गार

January 9, 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
ग्रामीण

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

January 9, 2026
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी
ग्रामीण

धाराशिव पालिकेत भाजपची सत्ता येताच ११७ कोटींच्या रस्त्यांवरील स्थगिती उठली

December 22, 2025
सबका विश्वास,सबका प्रयास हिच आपली ताकद — राणा जगजीतसिंह पाटील
ग्रामीण

शहरातील रस्ते कामांचा मार्ग मोकळास्थगिती रद्द : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

December 22, 2025
दक्षिण पुण्यात सावंत विहार येथे विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न!
मनोरंजन

दक्षिण पुण्यात सावंत विहार येथे विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न!

December 15, 2025
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी
ग्रामीण

शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी

December 12, 2025
Next Post
शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबर कौशल्य प्राप्त करणे गरजेचे – नरेश गडम

शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबर कौशल्य प्राप्त करणे गरजेचे - नरेश गडम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025