achukbaatmi.com
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
achukbaatmi.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

अखेर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश नरवडे निलंबित

Achuk Baatmi by Achuk Baatmi
October 10, 2025
in क्राईम व न्याय, ग्रामीण, संपादक
0
अखेर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश नरवडे निलंबित
0
SHARES
8
VIEWS

तुळजापूर

हलगर्जीपणा आणि आरोपींना अप्रत्यक्षपणे मदत करणे भोवले

तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथील गाजलेल्या सत्तार यासिन इनामदार खून प्रकरणात तपासातील हलगर्जीपणा आणि आरोपींना अप्रत्यक्षपणे मदत केल्याचा ठपका ठेवत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश नरवडे यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणातील आरोपींना वेळेत दोषारोपपत्र (चार्जशीट) सादर न केल्याने जामीन मिळाला होता, ज्यावर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, सिंदफळ येथे काही महिन्यांपूर्वी सत्तार यासिन इनामदार यांची हत्या झाली होती. या गंभीर गुन्ह्याचा तपास तुळजापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश नरवडे यांच्याकडे होता. कायद्यानुसार, अटकेच्या तारखेपासून ९० दिवसांच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र सादर करणे बंधनकारक असते. मात्र, तपास अधिकारी म्हणून नरवडे यांनी वेळेत दोषारोपपत्र सादर केले नाही.

याच तांत्रिक चुकीचा फायदा घेत आरोपींनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आणि केवळ दोषारोपपत्र वेळेवर दाखल न झाल्याच्या कारणावरून न्यायालयाने आरोपींना जामीन मंजूर केला.या घडामोडीनंतर न्यायालयाने पोलिसांच्या तपासावर ताशेरे ओढले. तपास अधिकाऱ्याच्या या चुकीमुळे आरोपींना एक प्रकारे मदतच झाल्याचे दिसून येत आहे.

Facebook Page Instagram Page WhatsApp Group Youtube आमच्या मीडिया हॅण्डल ला लाईक व फॉलोव करा

या प्रकरणामुळे झाली कारवाई………

तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथील सत्तार यासीन इनामदार यांच्या हत्येप्रकरणी तपासाची जबाबदारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नरवडे यांच्यावर सोपवण्यात आली होती. मात्र, आरोपींना मदत करण्याच्या हेतूने नरवडे यांनी तपासात हेतुपुरस्सर दिरंगाई करून आर्थिक लाभ घेतल्याचा गंभीर आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला होता. यासंदर्भात वसीम गफूर इनामदार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली होती.

दाखल केलेल्या तक्रारीनुसार, गुन्ह्यातील आरोपींच्या जामीन अर्जावरील सुनावणीवेळी तपास अधिकारी नरवडे यांनी जाणीवपूर्वक आपले म्हणणे सादर केले नाही. त्यामुळे न्यायालयाने ‘नो से’ (No Say) आदेश दिला. तसेच, वेळेत दोषारोपपत्र दाखल न केल्यामुळे खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना जामीन मंजूर झाला. जर तपास अधिकाऱ्यांनी वेळेवर दोषारोपपत्र दाखल केले असते, तर आरोपींना जामीन मिळाला नसता, असे तक्रारीत म्हटले आहे.

या तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश नरवडे यांना निलंबित करण्याचे आदेश दिले. या कारवाईमुळे पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

Previous Post

जनसामान्यांच्या आरोग्याचा आणि समाजसेवेचा ध्यास!

Next Post

भाजपा व आय.एम.ए.संघटना यांच्यातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर

Related Posts

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा एल्गार
ग्रामीण

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा एल्गार

January 9, 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
ग्रामीण

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

January 9, 2026
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी
ग्रामीण

धाराशिव पालिकेत भाजपची सत्ता येताच ११७ कोटींच्या रस्त्यांवरील स्थगिती उठली

December 22, 2025
सबका विश्वास,सबका प्रयास हिच आपली ताकद — राणा जगजीतसिंह पाटील
ग्रामीण

शहरातील रस्ते कामांचा मार्ग मोकळास्थगिती रद्द : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

December 22, 2025
दक्षिण पुण्यात सावंत विहार येथे विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न!
मनोरंजन

दक्षिण पुण्यात सावंत विहार येथे विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न!

December 15, 2025
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी
ग्रामीण

शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी

December 12, 2025
Next Post
भाजपा व आय.एम.ए.संघटना यांच्यातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर

भाजपा व आय.एम.ए.संघटना यांच्यातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025