achukbaatmi.com
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
achukbaatmi.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

भाजपा व आय.एम.ए.संघटना यांच्यातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर

Achuk Baatmi by Achuk Baatmi
October 11, 2025
in आरोग्य, ग्रामीण, राजकारण, संपादक
0
भाजपा व आय.एम.ए.संघटना यांच्यातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर
0
SHARES
62
VIEWS

उमरगा

डॉ.अनंत मुगळे यांची भाजपा जिल्हास्तरीय वैद्यकीय सेल संयोजक पदी निवड.

उमरगा शहरातील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ.अनंत मुगळे यांची भाजपाच्या वैद्यकीय सेल जिल्हा संयोजक पदी नुकतीच निवड झाली आहे. यामुळे शिंदे सेनेसह भाजपच्या जुन्या गटाला धक्का बसला आहे. परंतु या निवडीवरून शहरासह तालुक्यात अनेक चर्चांना उधाण आले आहे. याचे मुख्य कारण म्हणजे डॉ.अनंत मुगळे हे राजकारणात सक्रिय जरी नसले तरी ते माजी खासदार रवींद्र गायकवाड व माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांचे अत्यंत जवळचे निकटवर्तीय असल्याचे विख्यात आहे. ही निवड करताना भाजपच्या जुन्या गटाला विश्वासात घेतले नसल्याचे भाजपचे मूळ कार्यकर्त्यांकडून खाजगीत बोलले जात आहे. मुळात उमरगा येथील प्रसिद्ध डॉ.चंद्रकांत महाजन हे पूर्वीपासून भाजपचे सक्रिय कार्यकर्ते व नेते आहेत. जिल्हास्तरीय वैद्यकीय सेलच्या महत्त्वाच्या पदावर त्यांची निवड होणे अपेक्षित होते परंतु असे झाले नाही. या सर्व घडामोडीचा विचार करता भाजप मध्ये शह कटशह याचे राजकारण तर होत नाही ना याबाबत कुजबुज सुरू आहे.

आय.एम.ए. संघटनेतील अंतर्गत कलह व आगामी नगरपरिषद अध्यक्ष पदाचा उमेदवार..

Facebook Page Instagram Page WhatsApp Group Youtube आमच्या मीडिया हॅण्डल ला लाईक व फॉलोव करा

उमरगा नगर परिषदेच्या आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी उमरगा नगर परिषदेचे अध्यक्ष पद सर्वसाधारण पदासाठी जाहीर झाले आहे. या पार्श्वभूमीवर उमरगा येथील प्रसिद्ध डॉ.उदय मोरे यांचे आय.एम.ए. संघटनेतील एका गटाने नाव पुढे केले आहे. तसेच भाजपा कडून युवा नेते हर्षवर्धन चालुक्य यांचे नाव संभाव्य उमेदवार म्हणून नाव पुढे आले आहे. यांना शह देण्यासाठीच तर आय.एम.ए.संघटनेच्या एका गटाकडून व भाजपच्या एका गटाकडून अचानक पणे डॉ.अनंत मुगळे यांचे नाव पुढे आणले नाही ना याबाबतही चर्चा सुरू आहे.

डॉक्टरांना राजकीय आश्रयाची गरज भासत का आहे ..

उमरगा शहर हे मागील अनेक वर्षापासून वैद्यकीय सेवा देण्यासाठी प्रसिद्ध आहे. मागील कित्येक वर्षापासून उमरगा परिसरातीलच नव्हे तर शेजारील कर्नाटक राज्यातील रुग्ण मोठ्या प्रमाणात वैद्यकीय उपचारासाठी उमरगा येथे येत असतात. उमरगा शहरातील अनेक नामांकित डॉक्टर त्यांना चांगल्या दर्जाची वैद्यकीय सेवा माफक देत असत. परंतु मागील काही वर्षापासून नवीन नवीन लोकांची या क्षेत्रात भर पडली असून त्यांच्याद्वारे वैद्यकीय सेवेचे बाजारीकरण झाले आहे. यातील काही जणांनी वैद्यकीय सेवा देताना सेवाभाव न ठेवता सामाजिक भान विसरून व्यावसायिक दृष्टिकोनातून प्रचंड माया जमवली आहे. तसेच त्यांच्या रुग्णालयात चुकीच्या उपचारामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचे रुग्णालयात होणाऱ्या भांडणांचे अनेक घटना होत आहेत. विशेषतः या मंडळींकडून सामाजिक भान किंवा जाण ठेवली जात नसल्याबाबत सर्वसामान्य जनतेत या क्षेत्राविषयी कमालीची चिड निर्माण झाली आहे. त्यामुळेच कुठेतरी या लोकांना राजकीय आश्रयाची गरज भासत नाही ना असा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील विधानसभा निवडणुकीतही उमरगा शहरातील वैद्यकीय सेवा देणाऱ्या काही मंडळींनी मैत्री व जातीय समीकरणाच्या आधारावर आमदार प्रवीण स्वामी यांना मदत केल्याची अनेक जण चर्चा करतात.

Previous Post

अखेर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश नरवडे निलंबित

Next Post

आ. रोहितदा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त “क्रीडाभूषण पुरस्कार वितरण सोहळा” उत्साहात संपन्न

Related Posts

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा एल्गार
ग्रामीण

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा एल्गार

January 9, 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
ग्रामीण

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

January 9, 2026
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी
ग्रामीण

धाराशिव पालिकेत भाजपची सत्ता येताच ११७ कोटींच्या रस्त्यांवरील स्थगिती उठली

December 22, 2025
सबका विश्वास,सबका प्रयास हिच आपली ताकद — राणा जगजीतसिंह पाटील
ग्रामीण

शहरातील रस्ते कामांचा मार्ग मोकळास्थगिती रद्द : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

December 22, 2025
दक्षिण पुण्यात सावंत विहार येथे विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न!
मनोरंजन

दक्षिण पुण्यात सावंत विहार येथे विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न!

December 15, 2025
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी
ग्रामीण

शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी

December 12, 2025
Next Post
आ. रोहितदा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त “क्रीडाभूषण पुरस्कार वितरण सोहळा” उत्साहात संपन्न

आ. रोहितदा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त “क्रीडाभूषण पुरस्कार वितरण सोहळा” उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025