achukbaatmi.com
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
achukbaatmi.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

नामधारी आमदार…लाचार महसूल प्रशासन ?…

Achuk Baatmi by Achuk Baatmi
October 16, 2025
in ग्रामीण, राजकारण, संपादक
0
नामधारी आमदार…लाचार महसूल प्रशासन ?…
0
SHARES
109
VIEWS

उमरगा

गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांचे वर्चस्व वाढू नये यासाठी जिल्हा भरातील अनेक शक्ती एकत्र येत प्रवीण स्वामी सारख्या नवख्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले आहे. या घडामोडी मागे वेगवेगळ्या पक्षाच्या अनेक लोकांचे वेगवेगळे मनसुभे असले तरी राज्यात महायुतीची सरकार आल्याने या मंडळींचे स्वप्न भंगले. राज्यात जरी सत्ता नसली तरी आमदार प्रवीण स्वामी हे एक आमदार म्हणून प्रशासनाकडून शासनाच्या लोकहिताच्या योजना राबवून घेण्यात अयशस्वी ठरल्याचे दिसून येत आहे. याचेच उदाहरण म्हणजे धाराशिव जिल्हाभरासह उमरगा व लोहारा तालुक्यात अतिवृष्टी होऊन शेती, जनावरे, घरे व दुकाने यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्या नुकसानीचे आमदार म्हणून प्रशासनाला सोबत घेवून पाहणी करत त्या नागरिकांना मानसिक आधार देत तातडीची मदत मिळवून देण्याचा दिलासा देणे अपेक्षित असताना त्यांनी फक्त मतदारसंघातील काही मोजक्या भागांत जावून फोटोशेषन पुरता दौरा केला आहे. प्रशासनावर त्यांची पकड नसल्याने किंवा त्यांना त्यांच्या अधिकार व कर्तव्य याची संपूर्ण माहिती नसल्याने पाहणी दौरा दरम्यान बहुतांश वेळा एकही वरिष्ठ अधिकारी उपस्थित न्हवते. परंतु सत्ताधारी पक्षाच्या एका गटाच्या नेत्यांसमवेत महसूल प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी प्रत्येक ठिकाणी उपस्थित असल्याचे दिसून आले. त्यासोबतच आमदारांकडून प्रत्येक आपत्तीग्रस्त लाभार्थ्यांना तात्पुरत्या स्वरुपाची वयैक्तिक मदत तर सोडाच शासकीय मदत वेळेत मिळवून देण्यातही ते अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. यामुळे सद्या ते नामधारी व केवळ फोटो शेषनचे आमदार असल्याची नागरिकांमध्ये उघड चर्चा सुरु आहे.

Facebook Page Instagram Page WhatsApp Group Youtube आमच्या मीडिया हॅण्डल ला लाईक व फॉलोव करा

लाचार महसूल प्रशासन ?…

काही दिवसापूर्वी उमरगा तालुक्यातील सत्ताधारी पक्षाच्या एका गटाने महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा शेतकरी मेळावा मुरूम येथे आयोजित केला होता. यावेळी बहुधा मा.महसूल मंत्री यांनी तालुक्यात कोणत्या गटाच्या नेते किंवा कार्यकर्ते यांच्या प्रभावाखाली काम करावे असा कानमंत्र दिला असेल याचाच परिणाम म्हणून उमरगा तालूक्यात अतिवृष्टी काळात पडझड झालेल्या मालमत्तेची नुक्सान भरपाई म्हणून शासनाद्वारे दिली जाणारी आर्थिक मदत महसूल प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सत्ताधारी पक्षाच्या एका गटाच्या युवा नेत्याच्या हस्ते वाटप करण्यात आले. याचा तात्पर्य म्हणजे आमदार महोदय हे फक्त नामधारी झालेत किंवा भाजपच्या सत्ताधारी गटाकडून त्यांना नेहमी सहकार्य मिळत असल्याने ते या प्रकरणात मुग गिळून गप्प बसले आहेत हे विशेष. महसूल मंत्र्यांच्या दौऱ्यानंतर महसूल प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी हे प्रत्येक शासकीय कार्यक्रम, पाहणी दौरे आदी विविध कार्यक्रम सत्ताधारी पक्षाच्या या गटाच्या उपस्थितीत पार पाडत आहेत. हि बाब महसूल प्रशासनाची लाचारी असल्याचे सर्वसामान्य लोकांमध्ये बोलले जात आहे.

Previous Post

क्रिडा भूषण पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न

Next Post

खुद आमदाररांच्या गावात अवैद्य धंधायला उदान…

Related Posts

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा एल्गार
ग्रामीण

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा एल्गार

January 9, 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
ग्रामीण

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

January 9, 2026
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी
ग्रामीण

धाराशिव पालिकेत भाजपची सत्ता येताच ११७ कोटींच्या रस्त्यांवरील स्थगिती उठली

December 22, 2025
सबका विश्वास,सबका प्रयास हिच आपली ताकद — राणा जगजीतसिंह पाटील
ग्रामीण

शहरातील रस्ते कामांचा मार्ग मोकळास्थगिती रद्द : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

December 22, 2025
दक्षिण पुण्यात सावंत विहार येथे विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न!
मनोरंजन

दक्षिण पुण्यात सावंत विहार येथे विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न!

December 15, 2025
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी
ग्रामीण

शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी

December 12, 2025
Next Post
खुद आमदाररांच्या गावात अवैद्य धंधायला उदान…

खुद आमदाररांच्या गावात अवैद्य धंधायला उदान…

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025