उमरगा
शिंदी मिश्रित दारूमुळे एका युवक्काचा मृत्यू…
डिग्गी येथील 24 वर्षाचा तरुण अजय गोपीचंद डिग्गीकर रसायन मिश्रीत सिंधी व दारू पिऊन गावच्या कडेच्या नाल्यात मृत अवस्थेत आढळला.गेल्या अनेक वर्षांपासून अवैद्य धंदे बंद करण्यासाठी उपोषण आंदोलने झाली.तरीपण हफ्तेखोर प्रशासन गावातील स्वयंघोषित पुढारी यांच्या आशीर्वादाने हे धंदे खुलेआम चालत आहेत.त्यामुळे गावातील तरुण पिढी संपूर्ण व्यसनाच्या आहारी व गुन्हेगारी प्रवृत्तिकडे वळत आहे.गेल्या दोन तीन वर्षात हा 8 वा बळी आहे.डिग्गी गावचे आमदार असून देखील गावात सरास खुलेआम अवैध धंदे चालू आहेत मग बाकीच्या गावचा विचार न केलेला बरा.






