achukbaatmi.com
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
achukbaatmi.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

धाराशिवला २४ तास मुबलक पाणीपुरवठा करणार

Achuk Baatmi by Achuk Baatmi
November 14, 2025
in ग्रामीण, राजकारण, संपादक, संस्कृती व परंपरा
0
धाराशिवला २४ तास मुबलक पाणीपुरवठा करणार
0
SHARES
4
VIEWS

धाराशिव

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची जाहीर ग्वाही

बिहारमधील विजयाचे भाजपकडून जल्लोषात स्वागत

तब्बल शंभर किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावरून आपण धाराशिव शहरासाठी पाणी आणले. अशक्यप्राय वाटणारी योजना आपण पूर्ण केली. मात्र उबाठा गटाला त्याचे साधे नियोजनही करता आले नाही. येत्या काळात धाराशिव शहराला २४ तास मुबलक पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी नियोजन सुरू आहे. हे केवळ स्वप्न नाही तर उजनी पाणीपुरवठा योजना ज्यापद्धतीने आपण यशस्वी करून दाखवली अगदी त्याप्रमाणेच ही कामसुद्धा आपण करणारच अशी जाहीर ग्वाही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

Facebook Page Instagram Page WhatsApp Group Youtube आमच्या मीडिया हॅण्डल ला लाईक व फॉलोव करा

बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या ऐतिहासिक विजयाबद्दल भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शुक्रवारी दुपारी धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विजयी जल्लोष साजरा केला. महापुरुषांना अभिवादन करून एकमेकांना मिठाई वाटून, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि घोषणांच्या निनादात सर्वांनी हा आनंद साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकारी बांधवांना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मार्गदर्शन केले.

बिहारच्या जनतेने विकासाच्या मुद्द्यावर पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास ठेवत एनडीएला अपेक्षेपेक्षा मोठे, अभूतपूर्व आणि ऐतिहासिक बहुमत दिले आहे. या विजयाने राष्ट्रीय पातळीवरील विकासमार्ग अधिक भक्कम झाला आहे. बिहार राज्यातील सर्वसामान्य सामान्य नागरिकांचा भारतीय जनता पक्षावर असलेला दृढ विश्वास या निकालातून ठळकपणे अधोरेखित झाला आहे. धाराशिवची जनतादेखील महायुती व भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. येत्या पालिका निवडणुकीत त्याचा प्रत्यय येणार आहेच. यापूर्वी धाराशिव शहरात आपण अनेक महत्वाचे प्रकल्प आणि योजना पूर्णत्वास नेल्या आहेत. आपल्याकडून सर्वसामान्य नागरिकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. त्यासाठी अनेकजण त्यांच्या समस्या, अडीअडचणी आपल्याकडे घेऊन येतात. त्या सगळ्यांची पूर्तता करण्याची जबाबदारी आपली आहे. मात्र आपण सर्व पदाधिकारी बांधवांनी त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करायला हवा. शहरवासीयांच्या अडचणी दूर करणे आपले कर्तव्य आहे. मध्यंतरी पालिकेत सत्तेत असलेल्या ठाकरे गटाने शहराचे अक्षरशः वाटोळे केले आहे. त्या सगळ्या अडचणींवर मात करून आपण सर्वांनी कामाला लागावे असे आवाहनही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी केले.

बिहार विधानसभा निवडणुकीत अतोनात मेहनत घेणाऱ्या भारतीय जनता पक्ष व एनडीएच्या सर्व कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे व नेतेमंडळींचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच विकासाभिमुख सरकारला इतके भक्कम व ऐतिहासिक असे बहुमत देणाऱ्या बिहारच्या जनतेचे हार्दिक आभारही मानले. उपस्थितांनी एकमेकांना पेढे आणि लाडू भरवून हा आनंद साजरा केला. यावेळी श्री.दत्ताभाऊ कुलकर्णी, श्री.सुरेशभाऊ देशमुख, श्री.नितीन काळे,श्री.नेताजी पाटील, श्री.अनिल काळे, श्री.अमित शिंदे, श्री.नितीन भोसले, श्री.सुनील काकडे, श्री.अभय इंगळे, श्री.युवराज नळे, श्री.नितीन शेरखाने, श्री.संपतराव डोके, श्री.पांडुरंग लाटे, प्रीतीताई कदम, अंजली बेताळे, विद्या माने, श्री.अभिजित काकडे, श्री.रमण जाधव, श्री.मनोज रणखांब, श्री.विलास सांजेकर, श्री.मेसा जानराव यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Previous Post

धाराशिव जिल्हयात शरद पवार गटाला धक्का, २ वेळा विधानसभा लढलेला उमेदवार काँग्रेसच्या गळाला

Next Post

खरेपणा व राणा पाटील याचा दूरपर्यंत सबंध नाही, बिहारची धाराशिवबरोबर तुलना करून जनतेचा अपमान करु नका – तानाजी जाधवर यांचा पलटवार

Related Posts

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा एल्गार
ग्रामीण

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा एल्गार

January 9, 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
ग्रामीण

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

January 9, 2026
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी
ग्रामीण

धाराशिव पालिकेत भाजपची सत्ता येताच ११७ कोटींच्या रस्त्यांवरील स्थगिती उठली

December 22, 2025
सबका विश्वास,सबका प्रयास हिच आपली ताकद — राणा जगजीतसिंह पाटील
ग्रामीण

शहरातील रस्ते कामांचा मार्ग मोकळास्थगिती रद्द : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

December 22, 2025
दक्षिण पुण्यात सावंत विहार येथे विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न!
मनोरंजन

दक्षिण पुण्यात सावंत विहार येथे विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न!

December 15, 2025
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी
ग्रामीण

शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी

December 12, 2025
Next Post
खरेपणा व राणा पाटील याचा दूरपर्यंत सबंध नाही, बिहारची धाराशिवबरोबर तुलना करून जनतेचा अपमान करु नका – तानाजी जाधवर यांचा पलटवार

खरेपणा व राणा पाटील याचा दूरपर्यंत सबंध नाही, बिहारची धाराशिवबरोबर तुलना करून जनतेचा अपमान करु नका - तानाजी जाधवर यांचा पलटवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025