धाराशिव
- ऍड नितीन भोसले प्रवक्ता भारतीय जनता पार्टी धाराशिव जिल्हा
उबाठा कडे नगरपरिषद असताना शहराची जी बकाल अवस्था केली, त्याचा संताप आज धाराशिवकरांच्या मनात खदखदतो आहे. म्हणूनच या निवडणुकीत त्यांना थेट तिसऱ्या नंबरवर पाठवण्याचा ठाम निर्णय मतदारांनी घेतला आहे. उबाठा चे चार-पाच नगरसेवकही निवडून येणार नाहीत, याची खात्री झाल्याने उर्वरित तीन जागांपैकी किमान एक तरी मिळावी म्हणून आमच्या नेत्यांवर बेछूट व खोटे आरोप सुरू आहेत.
ज्यांच्या राजकारणाचा पाया खोटेपणावर उभा आहे, त्यांच्याकडून असले बेताल आरोप अपेक्षितच आहेत. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे नाव घेऊन स्वतःची टीआरपी वाढवण्याचा जुना धंदा आता सर्वांना ओळखीचा झाला आहे. अशा खोट्या आणि बिनबुडाच्या वक्तव्यांना आम्ही अजिबात भीक घालत नाही.
२१ तारखेला धाराशिवची जनता त्यांच्या या खोटारड्या राजकारणाला त्याची जागा दाखवून देणार,विकासाला साथ देणार, अपप्रचाराला नाही!







