achukbaatmi.com
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
achukbaatmi.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

कामाच्या दर्जावरून विचारलेल्या प्रश्नाला, राजकीय रंग देण्याचा प्रयत्न

Achuk Baatmi by Achuk Baatmi
December 17, 2025
in Uncategorized
0
कामाच्या दर्जावरून विचारलेल्या प्रश्नाला, राजकीय रंग देण्याचा प्रयत्न
0
SHARES
32
VIEWS

धाराशिव

-ऍड नितीन भोसले,
प्रवक्ता भारतीय जनता पार्टी धाराशिव जिल्हा.

तुळजापूर–नळदुर्ग रस्त्याच्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याच्या काम सुरू झाल्यापासूनच स्थानिक नागरिकांकडून विनोद गंगणे यांच्याकडे वारंवार तक्रारी येत होत्या. मात्र निवडणुकीचा काळ असल्याने “निवडणूक झाल्यावर पाहू” असे त्यांनी सांगितले होते. मंगळवारी पुन्हा एकदा स्थानिक नागरिकांनी ठोस तक्रार केल्यानंतर विनोद गंगणे यांनी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला. त्यानंतर आमदार राणाजगजितसिंह पाटील साहेब यांनी त्यांचे कर्मचारी व राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अभियंत्यांना घटनास्थळी कामाच्या दर्जाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी पाठवले. त्याठिकाणी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी येण्याचे प्रयोजन काय? कामाच्या दर्जावरून विचारलेल्या प्रश्नाला, उत्तर देण्याऐवजी त्याला राजकीय षड्यंत्राचा रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Facebook Page Instagram Page WhatsApp Group Youtube आमच्या मीडिया हॅण्डल ला लाईक व फॉलोव करा

संबंधित रस्त्याचे काम हे ऋषी मगर यांच्या नातेवाईकांकडून सुरू असल्याने तेही तेथे आले. मात्र कोणतीही चौकशी किंवा चर्चा न करता त्यांनी थेट शिवीगाळ सुरू केली, ज्यातून तेथे झटापट झाली. तो विषय तेथेच संपला असे वाटत असतानाच, नंतर ऋषी मगर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सार्वजनिक ठिकाणी विनोद गंगणे यांना जाहीरपणे शिवीगाळ केली.

घडलेली घटना नक्कीच दुर्दैवी आहे. तिचे समर्थन कोणीही करणार नाही. या प्रकरणात पोलीस प्रशासनाने तातडीने पावले उचलली असून जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे, ही आमची स्पष्ट मागणी आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनीही पोलीस प्रशासनाला तसे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या प्रकरणात कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्न नाही. मात्र जे प्रकरण मूळतः रस्त्याच्या कामाच्या दर्जावरून सुरू झाले आहे, त्याला राजकीय रंग देऊन आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न नेहमीप्रमाणे काँग्रेस जिल्हाध्यक्ष धीरज पाटील करत आहेत. वास्तविक अशा संवेदनशील विषयावर त्यांनी घाणेरडे राजकारण करू नये.आपसातील वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेण्याचे सोडून तो कसा अधिक चिघळला जाईल आणि आपली राजकीय पोळी त्यावर भाजता येईल असा त्यांचा प्रयत्न आहे. ते त्यांचे धाराशिव येथे बसलेले उबाठाच्या नेत्यांचे इशाऱ्यावर पत्रकार परिषद घेत आहेत, हे सर्वांना चांगलेच ठाऊक आहे.त्यांच्या सांगण्यावर इथं देखील महाविकास आघाडीने निवेदन देत राजकिय रंग देण्याचा प्रयत्न केला आहे..

Previous Post

दक्षिण पुण्यात सावंत विहार येथे विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न!

Next Post

शहरातील रस्ते कामांचा मार्ग मोकळास्थगिती रद्द : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Related Posts

बकाल कारभाराचा हिशेब २१ तारखेला.खोट्या आरोपांना जनता तिसरा नंबर देणार
Uncategorized

बकाल कारभाराचा हिशेब २१ तारखेला.खोट्या आरोपांना जनता तिसरा नंबर देणार

December 13, 2025
अंगाशी आलं की पळ काढणं ही राणा पाटील यांची जुनी सवय – शिवसेना प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी काढला भाजपला चिमटा
Uncategorized

भ्रष्टाचार झाला म्हणता मग भाजप सत्तेत का राहिला ?तानाजी जाधवर यांचा भाजपला उलट प्रश्न

November 30, 2025
भुलथापा व हवेत घोषणा करणं एवढंच राणा पाटील यांचं कर्तृत्व सोमनाथ गुरव
Uncategorized

भुलथापा व हवेत घोषणा करणं एवढंच राणा पाटील यांचं कर्तृत्व सोमनाथ गुरव

November 25, 2025
आपली एसटी ॲपद्वारे एसटीचा ठावठिकाणा कळणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
Uncategorized

आपली एसटी ॲपद्वारे एसटीचा ठावठिकाणा कळणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

October 3, 2025
श्री विठ्ठलसाई साखर कारखान्याचा बॉयलर प्रदिपन सोहळा संपन्न
Uncategorized

श्री विठ्ठलसाई साखर कारखान्याचा बॉयलर प्रदिपन सोहळा संपन्न

October 2, 2025
पूरग्रस्त पशुपालकांना दिलासा : चारा,औषधे व मदतीचा हात
Uncategorized

पूरग्रस्त पशुपालकांना दिलासा : चारा,औषधे व मदतीचा हात

October 1, 2025
Next Post
सबका विश्वास,सबका प्रयास हिच आपली ताकद — राणा जगजीतसिंह पाटील

शहरातील रस्ते कामांचा मार्ग मोकळास्थगिती रद्द : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025