achukbaatmi.com
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
achukbaatmi.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

शारदीय नवरात्र सांस्कृतिक महोत्सवात लोकनृत्यांचा बहार, रोहिणी सुरवसे यांचा सन्मान

Achuk Baatmi by Achuk Baatmi
September 28, 2025
in ग्रामीण, मनोरंजन, संपादक
0
श्री तुळजाभवानी देवीजींची शेषशाही अलंकार महापूजा
0
SHARES
50
VIEWS

तुळजापूर

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान आयोजित शारदीय नवरात्र सांस्कृतिक महोत्सवात आज लोककलेचा अप्रतिम संगम पाहायला मिळाला. रसिकपर्ण डान्स अकॅडमीच्या कलाकारांनी पारंपरिक लोकनृत्य सादर करत रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविणाऱ्या या नृत्यप्रस्तुत्यांमध्ये कोळीगीत, वाघ्या-मुरळी, दिंडी व गोंधळ यांचा समावेश होता. ताल-लयबद्ध पावलं आणि पारंपरिक वेशभूषेच्या माध्यमातून कलाकारांनी लोकजीवनातील वातावरण प्रेक्षकांसमोर जिवंत केले.

कार्यक्रमाची सुरुवात तहसीलदार तथा मंदिर संस्थानचे विश्वस्त अरविंद बोळंगे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. यानंतर लोकनृत्यांचा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी स्त्रीशक्तीचा गौरव करण्यासाठी कृषी व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेल्या रोहिणी धीरज सुरवसे यांचा सन्मान करण्यात आला. त्यांच्या शासकीय योजनांच्या प्रचार-प्रसारातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना श्री तुळजाभवानी देवीची प्रतिमा, कवड्याची माळ, महावस्त्र आणि अकरा हजार रुपयांचा धनादेश तहसीलदार बोळंगे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

Facebook Page Instagram Page WhatsApp Group Youtube आमच्या मीडिया हॅण्डल ला लाईक व फॉलोव करा

या सन्मानाने शारदीय नवरात्र सांस्कृतिक महोत्सवाच्या सोहळ्याला सामाजिक अंग प्राप्त झाले. रोहिणी सुरवसे यांनी शेतकरी व ग्रामीण समाजात विविध शासकीय योजना पोहोचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कार्यक्रमाला तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) माया माने, महिला व बालविकास अधिकारी किशोर गोरे, पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे व मंदिर संस्थानचे कर्मचारी उपस्थित होते.

शारदीय नवरात्र महोत्सवातील हा लोकनृत्यांचा कार्यक्रम महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडविणारा ठरला.

Previous Post

श्री तुळजाभवानी देवीजींची शेषशाही अलंकार महापूजा

Next Post

महावितरण कर्मचाऱ्यांकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात

Related Posts

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा एल्गार
ग्रामीण

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा एल्गार

January 9, 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
ग्रामीण

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

January 9, 2026
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी
ग्रामीण

धाराशिव पालिकेत भाजपची सत्ता येताच ११७ कोटींच्या रस्त्यांवरील स्थगिती उठली

December 22, 2025
सबका विश्वास,सबका प्रयास हिच आपली ताकद — राणा जगजीतसिंह पाटील
ग्रामीण

शहरातील रस्ते कामांचा मार्ग मोकळास्थगिती रद्द : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

December 22, 2025
दक्षिण पुण्यात सावंत विहार येथे विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न!
मनोरंजन

दक्षिण पुण्यात सावंत विहार येथे विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न!

December 15, 2025
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी
ग्रामीण

शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी

December 12, 2025
Next Post
महावितरण कर्मचाऱ्यांकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात

महावितरण कर्मचाऱ्यांकडून पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025