achukbaatmi.com
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
achukbaatmi.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

दक्षिण पुण्यात सावंत विहार येथे विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न!

Achuk Baatmi by Achuk Baatmi
December 15, 2025
in मनोरंजन, राजकारण, संपादक, संस्कृती व परंपरा
0
दक्षिण पुण्यात सावंत विहार येथे विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न!
0
SHARES
2
VIEWS

पुणे

कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे संस्थापक, युवा नेते मा. श्री. गिरीराज भाऊ सावंत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सावंत विहार, कात्रज येथील भिंतीचे बांधकाम, सुशोभीकरण आणि विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा काल मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री तथा विद्यमान आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत साहेब यांच्या शुभहस्ते व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या कार्यक्रमात कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या “कार्यसिद्धी दिनदर्शिका २०२६” चे देखील प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

यावेळी गिरीराज भाऊ सावंत यांनी आपल्या भाषणात दक्षिण पुण्यात लोकांच्या मागणीनुसार पाठपुरावा करून महानगरपालिकेच्या माध्यमातून आणलेल्या विकासनिधीचा आणि पूर्ण झालेल्या विकास कामांचा विशेष उल्लेख केला. त्यांनी आतापर्यंत सुमारे ₹१२ कोटींहून अधिक निधी आणल्याचे नमूद केले, ज्यातून खालील काही महत्त्वपूर्ण कामे मार्गी लागली आहेत व काही कामे लवकरच पूर्णत्वास येणार आहेत:

  • सावंत विहार फेज 3 ते अहिल्यादेवी होळकर उद्यान दरम्यान रस्ता
  • कात्रज डेअरी मागील भिंत व त्यावरील म्युरल्स उभारणे (सुशोभीकरण)
  • आंबेगाव पठार येथे बहुउद्देशीय सांस्कृतिक भवन उभारणे
  • कात्रज परिसरात नाट्यग्रहासाठी मंजुरी
  • वंडर सिटी शेजारील जागेत योगा हॉल बांधणे
  • सातारा रोड, कात्रज ते मोरेबाग बस स्टॉप ड्रेनेज लाईन टाकणे

गिरीराज भाऊंनी येणाऱ्या काळात स्मार्ट प्रभाग, ऑक्सिजन पार्क, ट्रॅफिक फ्री भाग आणि सुरक्षित परिसर निर्माण करण्याचे व्हिजन स्पष्ट केले.

Facebook Page Instagram Page WhatsApp Group Youtube आमच्या मीडिया हॅण्डल ला लाईक व फॉलोव करा

माजी आरोग्यमंत्री, आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत साहेब यांनी आपल्या भाषणात गिरीराज सावंत यांच्या कार्याचा उल्लेख करत त्यांच्यातील नेतृत्वाचे कौतुक केले.

  • ते म्हणाले की, लोकप्रतिनिधी सुसंस्कृत असावा, ताकदीने काम करणारा असावा, व्हिजन असणारा असावा
    *तसेच त्यांनी आपल्या आरोग्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील ‘आरोग्याची वारी पंढरीच्या दारी’ या उपक्रमाचा आणि ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ या योजनेचा उल्लेख केला, ज्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंद घेतली गेली.
  • देशात पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र भाई मोदी साहेबांचे आणि राज्यात महायुतीचे सरकार असून, पुण्यातही जनता महायुतीला १००% निवडून देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गिरीराज भाऊ सावंत हे तानाजीराव सावंत साहेब यांच्या समाजसेवेचा वारसा संवेदनशीलतेने जपत आहेत. त्यांनी महापालिका किंवा अन्य कोणत्याही पदावर नसतानाही सातत्याने जनतेचे प्रश्न सोडविण्याचे आणि १२ कोटींची कामे मार्गी लावण्याचे कार्य केले आहे.
कार्यसिद्धी प्रतिष्ठानच्या माध्यमातून मागील ५ वर्षांपासून सुरू असलेल्या सामाजिक उपक्रमांची माहिती यावेळी देण्यात आली:

  • भुकेल्याचा घास उपक्रम: संबंध पुण्यात २० फेब्रुवारी २०२३ पासून सुरू, २,५१,३३५ पेक्षा जास्त जेवणाचे डबे वितरित.
  • मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर: ३५० पेक्षा जास्त मोतीबिंदूग्रस्त रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया.
  • भव्य रक्तदान शिबीर: १५०० हून अधिक नागरिकांनी निःस्वार्थपणे रक्तदान केले.
  • ॲम्बुलन्स लोकार्पण सेवा
  • दिव्यांग सहाय्यता उपकरण वाटप
  • ‘माणुसकीची दिवाळी’ (फराळ व कपडे वाटप)
  • मोफत महाआरोग्य शिबिर असे अनेक सामाजिक उपक्रम घेतले.

या भव्य सोहळ्याला महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत साहेब, मा. नगरसेविका वर्षाताई तापकीर, मा. नगरसेविका रानीताई भोसले, दादा देवकर, गाडेकर सर, मिलिंद पन्हाळकर, रायबा भोसले, अभिषेक तापकीर, सचिन बदक, नाना निवगुने, कुंजीर सर, दिलीप जगताप, शंकर कडू, डॉ. संजय जगताप, राजाभाऊ घाडगे, अनंत शिंदे, महेश भोसले, रणधीर गायकवाड, गीतांजली जाधव, विविध सामाजिक संस्थांचे प्रमुख आणि दक्षिण पुण्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यसिद्धी प्रतिष्ठान दक्षिण पुण्याच्या शाश्वत विकासासाठी सदैव कटिबद्ध आहे!

दक्षिण पुण्यात सावंत विहार येथे विकासकामांचा भव्य लोकार्पण सोहळा संपन्न!

Previous Post

बकाल कारभाराचा हिशेब २१ तारखेला.खोट्या आरोपांना जनता तिसरा नंबर देणार

Next Post

कामाच्या दर्जावरून विचारलेल्या प्रश्नाला, राजकीय रंग देण्याचा प्रयत्न

Related Posts

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा एल्गार
ग्रामीण

महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना नाव बदलण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसचा एल्गार

January 9, 2026
तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक
ग्रामीण

तेरखेडा जिल्हा परिषद गटातून भाजपकडून प्रवीण घुले इच्छुक

January 9, 2026
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी
ग्रामीण

धाराशिव पालिकेत भाजपची सत्ता येताच ११७ कोटींच्या रस्त्यांवरील स्थगिती उठली

December 22, 2025
सबका विश्वास,सबका प्रयास हिच आपली ताकद — राणा जगजीतसिंह पाटील
ग्रामीण

शहरातील रस्ते कामांचा मार्ग मोकळास्थगिती रद्द : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

December 22, 2025
शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी
ग्रामीण

शहरातील रस्त्यांच्या कामांची निविदा प्रक्रिया का आणि कोणामुळे थांबली याची एसआयटी चौकशी करा –आमदार कैलास पाटलांची विधानसभेत मागणी

December 12, 2025
सातवाहन कालीन तीर्थकुंडासाठी साडेतीन कोटी
ग्रामीण

सातवाहन कालीन तीर्थकुंडासाठी साडेतीन कोटी

December 12, 2025
Next Post
कामाच्या दर्जावरून विचारलेल्या प्रश्नाला, राजकीय रंग देण्याचा प्रयत्न

कामाच्या दर्जावरून विचारलेल्या प्रश्नाला, राजकीय रंग देण्याचा प्रयत्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025