तुळजापुर
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर आस्थापनेवरील सर्व अधिकारी/कर्मचारी यांनी सामाजिक भावनेतुन पुरग्रस्त भागातील बाधीत नागरीकांची दिवाळी आनंदात पार पडावी या भावनेतुन छोटीशी मदत म्हणून १८ ऑक्टोबर रोजी हळदगाव ता.कळंब या गावात शिधा किटचे वाटप केले.
किर्ती किरण पुजार, जिल्हाधिकारी धाराशिव तथा अध्यक्ष, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांच्या प्रेरणेने तसेच मा. श्रीमती माया माने, तहसिलदार तथा व्यवस्थापक प्रशासन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांचे मार्गदर्शनाखाली जिवनावश्यक 17 वस्तुंचा समावेश असलेले एकूण १४० किराणा साहित्य किट वाटप करण्यात आले. यामध्ये डाळी, साखर, रवा, गूळ,गोडेतेल, चहा पावडर, टूथपेस्ट,टूथब्रश , साबण , लाल तिखट व मसाले यांचा समावेश आहे.
शासन निर्णयाप्रमाणे मंदिर आस्थापनेवरील सर्व अधिकारी व कर्मचारी माहे ऑक्टोबर या महिन्यातील एक दिवसाचे वेतन पुरग्रस्तांसाठी मा. मुख्यमंत्री सहायता निधी साठी दिले जाणार आहेच परंतु त्याशिवाय सर्व मंदिर अधिकारी व कर्मचारी यानी त्यांचे एक दिवसाचे वेतन रक्कम गोळा करून ही अधिकची मदत आई तुळजाभवानी ची सेवा म्हणून अर्पण केली आहे.
या प्रसंगी तहसिलदार तथा व्यवस्थापक यांचेसह धार्मिक व्यवस्थापक धमाले, अभियंता भोसले, जयसिंग पाटील, नागेश शितोळे, रमेश कवडे, गणेश नाईकवाडी,रवींद्र गायकवाड, कृष्णा डोलारे उपस्थित होते.






