achukbaatmi.com
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
achukbaatmi.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

भुलथापा व हवेत घोषणा करणं एवढंच राणा पाटील यांचं कर्तृत्व सोमनाथ गुरव

Achuk Baatmi by Achuk Baatmi
November 25, 2025
in Uncategorized
0
भुलथापा व हवेत घोषणा करणं एवढंच राणा पाटील यांचं कर्तृत्व सोमनाथ गुरव
0
SHARES
1
VIEWS


धाराशिव

Facebook Page Instagram Page WhatsApp Group Youtube आमच्या मीडिया हॅण्डल ला लाईक व फॉलोव करा

भुलथापा मारणे, हवेतल्या गप्पा करून जनतेला फसवणे एवढंच राणा पाटील यांचं कर्तृत्व असल्याच शिवसेना ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख सोमनाथ गुरव यांनी म्हटले आहे. यांचा ‘विकास’ हा फक्त कागदावरचा असून प्रत्यक्षात होणाऱ्या विकासाला आडकाटी आणणे ही राणा पाटील यांची ओळख आहे. यावेळी गुरव म्हणाले की, राणा पाटील यांनी त्यांच्या भविष्यातील शहर विकासाचे पाच ठळक मुद्दे मांडले. यामध्ये नियमित व सुरळीत पाणीपुरवठा करण्याचा संकल्प सोडला पण ते कस देणार हे आपण सांगणार नसल्याच ते म्हणाले. म्हणजे पहिलाच मुद्दा हवेत गप्पा मारल्यासारखा झाला. दुसरा मुद्दा रस्त्याच्या जवळपास दीडशे कोटीच्या निधी बाबत व अन्य निधी आणण्याचा त्यांनी उल्लेख केला. त्यावर गुरव म्हणाले मर्जीतल्या गुत्तेदारास रस्त्याचं काम मिळावं यासाठी वीस महिने प्रक्रिया याच राणा पाटलांनी राबवू दिली नाही.त्यामुळं शहरवासियांना झालेल्या त्रासाला फक्त तुम्ही जबाबदार आहात. निवडणुकीच्या तोंडावर अजून निधी आणण्यासाठी प्रयत्न करण्याची भाषा तुम्हाला शोभत नाही. शिवाय जे 140 कोटी निधी आणला म्हणून स्वतः ची पाठ थोपटून घेत आहेत आतापर्यंत हे रस्ते फक्त तुमच्या कमिशन साठी थांबवले असा याचा अर्थ निघतो. ज्या शहरात भुयारी गटार योजना राबवली जाते तिथं रस्त्यासाठी 500 कोटींचा निधी मिळत असतो. मात्र यांच्याकडून फक्त 140 कोटी एवढाच निधी शहरास मिळाला. म्हणजे शहराच्या हक्काच्या 360 कोटींचा निधी यांना आणता आला नाही हे यांचं कर्तृत्व असल्याच गुरव म्हणाले.
तिसरा मुद्दा त्यांनी सफाई व कचरा डेपो च्या प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असं सांगितलं. त्यावर गुरव यांनी राणा पाटील यांना प्रतिप्रश्न केला 4 वर्ष प्रशासकाचा काळ असो की 2019 पर्यंत तुम्हीच इथं आमदार असो त्या अगोदरही सत्ता तुमचीच होती. मग तेवढ्या काळात तुम्हाला हा प्रश्न का सोडवता आला नाही शिवाय तुमचेच बगलबच्चे यांच्याकडे या कामाचं टेंडर होते. तुम्ही पुन्हा तेच करण्यासाठी सत्ता मागत आहात का? असा प्रश्न गुरव यांनी राणा पाटलांना विचारला.
चौथा मुद्दा त्यांनी उद्यान निर्मितीसाठी पाच वर्षात 25 कोटींचा निधी आणतो म्हणाले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर यांच्यामुळे यांनी तीन बगीचासाठी सात कोटी व आठवडी बाजारासाठी दहा कोटी असा बारा कोटीचा निधी मंजूर केला होता. महायुतीचे सरकारने सत्तेवर येताच या कामाना स्थगिती दिली. 2022 पासून आतापर्यंत तुम्हाला ही काम करणं का झालं नाही याचेही उत्तर राणा पाटील यांनी द्यावं असं आव्हान गुरव यांनी दिले आहे. पाचवा मुद्दा पारदर्शक प्रशासन आणणार ते जनतेनं जिल्हा परिषद व 2016 पर्यंत तुमच्या ताब्यात असलेल्या नगरपालिकेचा कारभार पाहिलेला त्यामुळं त्यावर तर आपण न बोललं बरं होईल असाही टोला सोमनाथ गुरव यांनी लगावला.
डिसेंबर 2021 पासून पालिकेवर प्रशासक आहेत. महाविकास आघाडी सरकार जुलै 2022 पर्यंत होत. त्यानंतर पुन्हा राणा पाटील यांचीच सत्ता आहे. 2014- 2019 तेच धाराशिवचे आमदार होते. डिसेंबर 2016 ला पालिका निवडणूक झाली तेव्हापासून ऑक्टोबर 2019 पर्यंत तुम्हीच आमदार होतात. मग त्याकाळात आपण काय केलं? निवडणुकीच्या तोंडावर नुसत्या थापा मारायच्या व हवेत बोलायचं एवढंच तुमच कर्तृत्व असून विकासाची तुम्हाला किती तळमळ आहे हे जनतेला चांगल माहिती आहे.

Previous Post

सबका विश्वास,सबका प्रयास हिच आपली ताकद — राणा जगजीतसिंह पाटील

Next Post

शेतकरी बांधवांच्या न्यायालयीन लढ्याला यशपीक विम्याचे २२० कोटी मिळणार : आमदार राणाजगजितसिंह पाटील

Related Posts

कामाच्या दर्जावरून विचारलेल्या प्रश्नाला, राजकीय रंग देण्याचा प्रयत्न
Uncategorized

कामाच्या दर्जावरून विचारलेल्या प्रश्नाला, राजकीय रंग देण्याचा प्रयत्न

December 17, 2025
बकाल कारभाराचा हिशेब २१ तारखेला.खोट्या आरोपांना जनता तिसरा नंबर देणार
Uncategorized

बकाल कारभाराचा हिशेब २१ तारखेला.खोट्या आरोपांना जनता तिसरा नंबर देणार

December 13, 2025
अंगाशी आलं की पळ काढणं ही राणा पाटील यांची जुनी सवय – शिवसेना प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी काढला भाजपला चिमटा
Uncategorized

भ्रष्टाचार झाला म्हणता मग भाजप सत्तेत का राहिला ?तानाजी जाधवर यांचा भाजपला उलट प्रश्न

November 30, 2025
आपली एसटी ॲपद्वारे एसटीचा ठावठिकाणा कळणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
Uncategorized

आपली एसटी ॲपद्वारे एसटीचा ठावठिकाणा कळणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

October 3, 2025
श्री विठ्ठलसाई साखर कारखान्याचा बॉयलर प्रदिपन सोहळा संपन्न
Uncategorized

श्री विठ्ठलसाई साखर कारखान्याचा बॉयलर प्रदिपन सोहळा संपन्न

October 2, 2025
पूरग्रस्त पशुपालकांना दिलासा : चारा,औषधे व मदतीचा हात
Uncategorized

पूरग्रस्त पशुपालकांना दिलासा : चारा,औषधे व मदतीचा हात

October 1, 2025
Next Post
धाराशिवला २४ तास मुबलक पाणीपुरवठा करणार

शेतकरी बांधवांच्या न्यायालयीन लढ्याला यशपीक विम्याचे २२० कोटी मिळणार : आमदार राणाजगजितसिंह पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025