achukbaatmi.com
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
achukbaatmi.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

पूरग्रस्त पशुपालकांना दिलासा : चारा,औषधे व मदतीचा हात

Achuk Baatmi by Achuk Baatmi
October 1, 2025
in Uncategorized
0
पूरग्रस्त पशुपालकांना दिलासा : चारा,औषधे व मदतीचा हात
0
SHARES
2
VIEWS

तुळजापूर

पुरामुळे जिल्ह्यातील पशुपालकांचे मोठे नुकसान झाले असले तरी शासन व विविध स्वयंसेवी संस्था एकत्र येऊन संकटग्रस्तांना दिलासा देण्यासाठी पुढे सरसावल्या आहेत.पशुपालकांना मदत व्हावी यासाठी चारा,औषधे,क्षार मिश्रण व आर्थिक मदत तत्परतेने पुरवली जात आहे.

परांडा, भूम व वाशी तालुक्यात आतापर्यंत १९.५ टन मुरघास वाटप करण्यात आले असून,आज आणखी २३ टन मुरघास शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी उपलब्ध करून दिला जात आहे.बायफ संस्थेमार्फत तेर, रामवाडी,हिंगळजवाडी व म्होतरवाडी येथे मोफत १०० किलो क्षार मिश्रण देण्यात आले असून,संस्थेचा २० हजार शेतकऱ्यांसाठी लस व क्षार मिश्रण पुरवठ्याचा संकल्प आहे.

मुंबई व्हेटरनरी ॲल्युमिनी या संस्थेने परांडा तालुक्यातील शेलगाव दत्तक घेऊन पशुसंवर्धनासाठी विशेष उपाययोजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Facebook Page Instagram Page WhatsApp Group Youtube आमच्या मीडिया हॅण्डल ला लाईक व फॉलोव करा

तसेच वॉटरशेड फाउंडेशनकडून चारा, औषधे व लसी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.याशिवाय राजाराम पाटील, कोल्हापूर एम.आर.यांच्याकडून व्हेटरनरी औषधे पुरवली जात आहेत,तर भारतीय किसान संघाच्या वतीने परांडा तालुक्यात अडीच टन चारा वाटप करण्यात आला असून ५ हजार होमिओपॅथिक किटचे वितरण होणार आहे.

दरम्यान,जिल्ह्यात एकूण ४०६ जनावरांचा मृत्यू झाला असून यात २८५ मोठी व ९४ लहान दुधाळ जनावरे,तर २३ मोठी व ४ लहान ओढकाम करणारी जनावरे समाविष्ट आहेत.या हानीची भरपाई म्हणून महसूल विभागामार्फत ४६.४९ लाख रुपयांचा निधी पीडित पशुपालकांना वितरीत करण्यात आला आहे.

पूरग्रस्त पशुपालकांना अन्नधान्याबरोबरच त्यांच्या जनावरांच्या आरोग्याचीही काळजी घेणारी ही मदत हळूहळू त्यांना सावरत आहे.संकटाच्या काळात मिळालेल्या या सहकार्यामुळे पशुपालकांचा आत्मविश्वास पुन्हा दृढ होत असल्याचे चित्र गावोगावी पाहायला मिळत आहे.

Previous Post

शारदीय नवरात्र महोत्सवात रंगले लोकसंगीताचे आख्यान

Next Post

तुळजाभवानी मंदिरात घटोत्थापना

Related Posts

कामाच्या दर्जावरून विचारलेल्या प्रश्नाला, राजकीय रंग देण्याचा प्रयत्न
Uncategorized

कामाच्या दर्जावरून विचारलेल्या प्रश्नाला, राजकीय रंग देण्याचा प्रयत्न

December 17, 2025
बकाल कारभाराचा हिशेब २१ तारखेला.खोट्या आरोपांना जनता तिसरा नंबर देणार
Uncategorized

बकाल कारभाराचा हिशेब २१ तारखेला.खोट्या आरोपांना जनता तिसरा नंबर देणार

December 13, 2025
अंगाशी आलं की पळ काढणं ही राणा पाटील यांची जुनी सवय – शिवसेना प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी काढला भाजपला चिमटा
Uncategorized

भ्रष्टाचार झाला म्हणता मग भाजप सत्तेत का राहिला ?तानाजी जाधवर यांचा भाजपला उलट प्रश्न

November 30, 2025
भुलथापा व हवेत घोषणा करणं एवढंच राणा पाटील यांचं कर्तृत्व सोमनाथ गुरव
Uncategorized

भुलथापा व हवेत घोषणा करणं एवढंच राणा पाटील यांचं कर्तृत्व सोमनाथ गुरव

November 25, 2025
आपली एसटी ॲपद्वारे एसटीचा ठावठिकाणा कळणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
Uncategorized

आपली एसटी ॲपद्वारे एसटीचा ठावठिकाणा कळणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

October 3, 2025
श्री विठ्ठलसाई साखर कारखान्याचा बॉयलर प्रदिपन सोहळा संपन्न
Uncategorized

श्री विठ्ठलसाई साखर कारखान्याचा बॉयलर प्रदिपन सोहळा संपन्न

October 2, 2025
Next Post
तुळजाभवानी मंदिरात घटोत्थापना

तुळजाभवानी मंदिरात घटोत्थापना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025