achukbaatmi.com
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी
No Result
View All Result
achukbaatmi.com
No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

आपली एसटी ॲपद्वारे एसटीचा ठावठिकाणा कळणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Achuk Baatmi by Achuk Baatmi
October 3, 2025
in Uncategorized
0
आपली एसटी ॲपद्वारे एसटीचा ठावठिकाणा कळणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
0
SHARES
3
VIEWS

मुंबई


प्रत्येक थांब्यावर एसटीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना एसटीचा अचुक ठावठीकाणा काळावा, यासाठी ” आपली एसटी ” या नावाने नवीन ॲप चे दसऱ्याच्या मुहूर्तावरण लोकार्पण होत असून भविष्यात प्रवाशांना त्याचा चांगला फायदा होईल!

तथापि,१२ हजार पेक्षा जास्त बसेस व राज्यभरातील १ लाख पेक्षा जास्त मार्गाचे मॅपिंग करून हे ॲप विकसित केले आहे.भविष्यात लाखो प्रवासी याचा वापर करणार असल्यामुळे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये काही तांत्रिक त्रुटी निर्माण झाल्यास,प्रवाशांनी त्या जरूर सुचित कराव्यात,असे आवाहन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे.जेणेकरून एक परिपूर्ण ॲप विकसित करण्यास मदत होईल.

*आपली एसटी एक मराठमोळे नाव*

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) प्रवाशांच्या सोयीसाठी कम्यूटर ॲप नव्या रुपात सादर केलं असून आता या ॲपला ‘आपली एसटी’ (Aapli ST) असे मराठमोळे नाव परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहे. अर्थात,या ॲपमुळे सर्वसामान्य मराठी प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ, सोयीस्कर आणि पारदर्शक होईल यावर अधिक भर दिला जाणार आहे.

‘रोजमाल्टा ऑटोटेक लि.’ या कंपनीच्या सहाय्याने विकसित केलेल्या ” आपली एसटी “(Aapli ST) ॲपमुळे प्रवासी आपल्या जवळच्या बसस्थानकाची माहिती मिळवू शकणार असून प
प्रवासी माहिती केंद्राद्वारे (‘Passenger Information System’ ) बस कुठून सुटणार (STD) आणि ती बस थांब्यावर केव्हा पोहोचणार (ETA) याची वस्तुस्थिती जन्य (रिअल-टाइम) माहिती मिळेल.त्यामुळे प्रवाशांना थांब्यावर थांबून वेळ घालवण्याची गरज नाही,तर ते थेट बस उपलब्धतेनुसार थांब्यावर पोहोचू शकतील.

ॲपमध्ये अँड्रॉइड आणि ॲपल वापरकर्त्यांसाठी अनेक उपयुक्त सुविधा (फीचर्स )उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.यात प्रवाशांना आपल्या जवळच्या बस थांब्याचा शोध घेणे,दोन थांब्यांदरम्यान चालणाऱ्या बसच्या वेळापत्रकाची माहिती पाहणे, आरक्षण केलेल्या तिकीटातील बस क्रमांक अथवा सेवा क्रमांक टाकून बसची थेट मागोवा (लाईव्ह ट्रॅकिंग करणे) घेणे,यांचा समावेश आहे.

Facebook Page Instagram Page WhatsApp Group Youtube आमच्या मीडिया हॅण्डल ला लाईक व फॉलोव करा

याशिवाय प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ॲपमध्ये आपत्कालीन क्रमांकांची यादी देखील देण्यात आली असून, एकाच क्लिकमध्ये कोणत्याही आपत्कालीन क्रमांकावर कॉल करता येणार आहे.

सध्या या ॲपवर राज्यातील तब्बल १२,००० हून अधिक बसेसचे लाईव्ह डेटा उपलब्ध आहे.भविष्यात सर्व बसेस या ॲपच्या कार्यकक्षेत येतील. पुढे प्रवाशांच्या अभिप्रायाच्या आधारे ॲपमध्ये आणखी सुधारणा करण्यात येणार आहेत.तसेच लवकरच एसटीचे (MSRTC ) सध्या असलेल्या… तिकिट बुकिंग ॲपमध्येही बसची थेट माहिती (Live Data) समाविष्ट केली जाणार आहे, ज्यामुळे आगाऊ तिकीट आरक्षण करणाऱ्या प्रवाशांनाही मोठी सुविधा मिळेल.

एसटीचा उद्देश प्रवाशांना अधिक विश्वासार्ह,पारदर्शक आणि सुरक्षित सेवा देण्याचा असून,आपली एसटी (Aapli ST) ॲप या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.

तसेच महामंडळाने याबाबत प्रवाशांकडून सूचना व अभिप्राय मागवुन , त्यांच्या अपेक्षेनुसार ॲपमध्ये सतत सुधारणा कराव्यात अशी सूचना त्यांनी केली आहे.

——————————————————————-
सध्या हे ॲप MSRTC commuter app या नावाने प्ले स्टोअर मधून प्रवाशांना डाऊनलोड करून घेता येईल.तथापि,आपली एसटी (Aapli ST) हे नाव लवकरच प्ले स्टोअर मध्ये दिसू लागेल.

Previous Post

श्री विठ्ठलसाई साखर कारखान्याचा बॉयलर प्रदिपन सोहळा संपन्न

Next Post

शासनाने आरोग्याच्या विषयात राजकारण करू नये — कैलास पाटील

Related Posts

कामाच्या दर्जावरून विचारलेल्या प्रश्नाला, राजकीय रंग देण्याचा प्रयत्न
Uncategorized

कामाच्या दर्जावरून विचारलेल्या प्रश्नाला, राजकीय रंग देण्याचा प्रयत्न

December 17, 2025
बकाल कारभाराचा हिशेब २१ तारखेला.खोट्या आरोपांना जनता तिसरा नंबर देणार
Uncategorized

बकाल कारभाराचा हिशेब २१ तारखेला.खोट्या आरोपांना जनता तिसरा नंबर देणार

December 13, 2025
अंगाशी आलं की पळ काढणं ही राणा पाटील यांची जुनी सवय – शिवसेना प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी काढला भाजपला चिमटा
Uncategorized

भ्रष्टाचार झाला म्हणता मग भाजप सत्तेत का राहिला ?तानाजी जाधवर यांचा भाजपला उलट प्रश्न

November 30, 2025
भुलथापा व हवेत घोषणा करणं एवढंच राणा पाटील यांचं कर्तृत्व सोमनाथ गुरव
Uncategorized

भुलथापा व हवेत घोषणा करणं एवढंच राणा पाटील यांचं कर्तृत्व सोमनाथ गुरव

November 25, 2025
श्री विठ्ठलसाई साखर कारखान्याचा बॉयलर प्रदिपन सोहळा संपन्न
Uncategorized

श्री विठ्ठलसाई साखर कारखान्याचा बॉयलर प्रदिपन सोहळा संपन्न

October 2, 2025
पूरग्रस्त पशुपालकांना दिलासा : चारा,औषधे व मदतीचा हात
Uncategorized

पूरग्रस्त पशुपालकांना दिलासा : चारा,औषधे व मदतीचा हात

October 1, 2025
Next Post
शासनाने आरोग्याच्या विषयात राजकारण करू नये — कैलास पाटील

शासनाने आरोग्याच्या विषयात राजकारण करू नये --- कैलास पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025

No Result
View All Result
  • ताज्या घडामोडी
  • राजकारण
  • आरोग्य
  • क्राईम व न्याय
  • ग्रामीण
  • मनोरंजन
  • संस्कृती व परंपरा
  • कृषी

© 2025